सातारा – आक्षेपार्ह पोस्ट करणारा मुख्य संशयित युवक कोरेगाव तालुक्यातील असून त्याला सातारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने या प्रकाराची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, साताऱ्याचे उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक शेख म्हणाले,”” या युवकाने इन्स्टाग्रामचे खाते “नोबिक्स 70′ या खात्यावर महापुरुषांबद्दल आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या युवकाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. सायबर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई झाली. हा युवक कोरेगाव तालुक्यातील असून त्याने याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाचे इन्स्टाग्राम अकांउंट हॅक केले होते.अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मैत्रिणींमध्ये विसंवाद होऊन त्याचा अपमान व्हावा या हेतूने महापुरूषांच्या नावाने “नोबिक 70′ या अकांउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट केली. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कोरेगाव तालुक्यातील युवकाच्या संपर्कात असणारी मैत्रिण