आढाव दांपत्य हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राज्यभर गाजलेल्या राहुरीतील आढाव वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची परवानगी जिल्हा सञ न्यायालयाने दिली आहे.

                 राहुरी तालुक्यातील आढाव वकील दांपत्याचा दुहेरी हत्याकांड राज्यभर गाजले.दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात गुरंनं.७५/२०२४ नुसार दाखल करण्यात आला होता.जिल्हा सत्र न्यायालयात खटला क्रमांक. १२६/२०२४ सुनावणी सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग,भैया उर्फ सागर साहेबराव खांदे,शुभम संजीत महाडीक, बबन सुनील मोरे यांना सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्फत न्यायालयाकडे खुन खटल्यातील आरोपींना जिल्हा बाहेर वर्ग करण्याची मागणी राहुरी पोलीस व जेल अधीक्षक राहुरी यांनी केली होती.

                      जिल्हा सञ न्यायालयाने खुन खटल्यातील आरोपींना जिल्हा बाहेर  वर्ग करण्याची परवानगी दिल्याने या आरोपींना नाशिक येथिल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने सदर चारही आरोपींना राहुरी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे जमा केले आहे. या खुन खटल्यातील आरोपी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने जिल्हा सञ न्यायालयाने राहुरी सब जेल येथेच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

               सदरची कारवाई माननीय न्यायालयाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक  राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे,पो. हे. बाळासाहेब महंडुळे,पो. ना. संभाजी बडे, उत्तरेश्वर मोराळे, पो. कॉ. अंबादास गीते, इफतेखार सय्यद, प्रतीक आहेर आदींनी कामगिरी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here