उरणमध्ये युवतीची तीक्ष्ण हत्याराने वार करीत निर्घुण हत्या …

0

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज.

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) नवी मुंबईतील युवतीवर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरण मध्ये एका २२ वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आले आहे.उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय २२ ही गुरुवार दिनांक २५/७/२०२४ रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दिडच्या सुमारास उरण बाझार पेठ येथे आढळून आली. मात्र त्या नंतर ती  कुठेही दिसली नाही. मुलगी घरी न आल्याने तीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तीच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदविली. तीचा शोध सुरु होता मात्र ती कुठेही सापडली नाही. शुक्रवार दिनांक २६/७/२०२४ रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोलपंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले. सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले. मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली. सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचेच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे. पोस्मार्टम झाल्यानंतर तीच्या शरीरावर अनेक वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्त्या केल्याची बाब पोस्मार्टम मधून समोर आली आहे.

सदर घटना समजताच शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय मध्ये धाव घेतली. घडलेल्या घटनेचा सर्वांनीच जाहीर निषेध केला.सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे. यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला ? यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला ?  या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. उरण मध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेउन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेने केली आहे. यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अंत्यत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने, मानव जातील काळिमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला, आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.

सदर घटना स्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी,शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, गणेश नलावडे, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा, तालुकाध्यक्ष सीमा घरत, भारतीय जनता पार्टीचे रवीशेठ भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, जेएनपीएचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते संतोष घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.सदर आरोपीचा शोध सुरु असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. व यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिले. या निंदनीय कृत्याचे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठया प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे. तर उरण मधील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here