कोपरगाव शहरात टोळी युद्धातून गोळीबार ; एकजण गंभीर जखमी

0

कोपरगाव – ( प्रतिनिधी ) कोपरगाव शहरात टोळी युद्धातून गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून यातील आरोपी मात्र फरार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरात आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान स्वामी समर्थ केंद्राच्या जवळ दोन गुंडांच्या टोळ्यांमध्ये पूर्व वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला . या वादाला शहरात सुरु असलेल्या अवैध रेशन घोटाळ्यातील दोन टोळ्यामध्ये असलेल्या वादाची किनार आहे . या गोळीबारामध्ये तन्वीर रंगरेज हा जखमी झाला असून त्यास छाती आणि कमरेस दोन गोळ्या लागल्या असून त्यावर आधी आत्मा मलिक व नंतर नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरामध्ये मात्र एकाचा खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील तन्वीर रंगरेज व नजिम शेख यांच्या दोन टोळ्या अवैध रेशनच्या काळ्याबाजारासह इतरही अवैध व्यवसायात सक्रीय आहे . यातूनच त्यांच्यामध्ये वर्चस्वाची स्पर्धा सतत सुरु असते. या वर्चस्वाच्या चढाओढीतून या टोळ्यांमध्ये वरचे वर भांडणे व हाणामारी होत असते. या महिन्याच्या सुरवातीला ०९ सप्टेंबर रोजी झाली होती. त्यात त्यांनी एकमेकाच्या विरुध्द गुन्हे दाखल केले होते. मात्र काही दिवसातच या टोळ्यांतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

यातील आरोपी श्रीरामपूर येथील आरोपी मण्या बेग व त्याचे साथीदार आज दुपारी कोपरगाव मध्ये आले होते. व त्यांनी आपल्या मारुती स्विफ्ट गाडीतून तन्वीर रंगरेज याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. घटनास्थळ कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यातील जखमी असलेला तन्वीर रंगरेज याला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी आत्मा मलिक रुग्नालयात दाखल करण्यात आले . मात्र त्यास दोन गोळ्या लागल्या असून एक कमरेच्या खाली खुब्या जवळ तर दुसरी छाती जवळ लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे समजते आहे.

या घटनेमुळे कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक वमने,पो, निरीक्षक मथुरे यांच्यासह आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here