देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील गटार साफ करण्यासाठी लागणाऱ्या १६ हजार रूपये किमंतीच्या ढकलगाड्या अज्ञात चोरटयाने चोरून नेण्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे.नगर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथिल दोघांना ताब्यात घेतले असुन मुद्देमाल या चोरट्यांनी काढुन दिला आहे.
याबाबत विकास शिवाजी गडाख, धंदा-खासगी नोकरी, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.की, देवळाली नगरपालिकेने आरोग्य विभागाचा ठेका नाशिकच्या दिग्विजय एन्टरप्रायजेस या कंपनीला दिलेला
आहे. तेथे आपण सुपरवायझर म्हणून काम करतो. देवळालीतील विसावा ओटा येथील नगरपालिकेचे कर्मचाऱ्याकडून गटार साफ करताना लागणाऱ्या ४ ढकलगाड्या लावलेल्या होत्या. मात्र, १३ तारखेला याढकलगाड्या लावलेल्या ठिकाणी दिसून आल्या नाही. त्याची चौकशी केली असता या लोखंडी ढकलगाड्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी विकास गडाख यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत
होते.नगर येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या चोरीचा तपास करताना श्रीरामपूर येथिल दोघांना ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.