घरफोडी करणाऱ्या चोरट्यास खर्डा पोलिसांकडून अटक… 

0

एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त खर्डा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील  देवदैठण येथील दि. २ जुलै  रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगवंत त्रिंबक भोरे या इसमाच्या घरी  घरफोडी  झाली होती. दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची उचका पाचककरून घरातील  वीस ग्रॅम सोन्याचे दागिने (दोन तोळे) सोने, व चाळीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ज्या ठिकाणी घटना घडली त्या घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे व हा पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे तपासात धागा दोरा लागत नव्हता., परंतु खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. रईस सय्यद,पोलीस कॉ. प्रवीण थोरात,पोलीस कॉ. गणेश बडे,पोलीस कॉ. धनराज बिराजदार,यांनी   मोठ्या शिताफीने तपास करून या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन  आरोपीचे नाव निष्पन्न करून आरोपी विश्वजित  सिद्धेश्वर भोरे वय २६ वर्ष हल्ली रा. देवदैठन ता.जामखेड या आरोपीस अटक करण्यात आली.  त्यांचेकडून दोन तोळे सोने व वीस हजार रू.असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस अंमलदार प्रवीण थोरात, गणेश बडे, धनराज बिराजदार, यांच्या पथकाने केलेली आहे. त्याबद्दल सदर पथकाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here