जामखेड पोलीसांनी गंभीर गुन्हे दाखल असणारे सहा गुंडांना केले तडीपार

0

रेकॉर्डवरील इतर दहा ते बारा गुंडांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपार प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु पोलीस निरीक्षक महेश पाटील 

जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार आरोपी  तुषार हनुमंत पवार जांबवाडी, अक्षयकुमार अभिमान शिंदे  पोकळेवस्ती, किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे  मिलींदनगर,  नितीन राहीदाय डोकडे गोरोबा टॉकीज शेजारी, रमेश राजेंद्र काळे  गोरोबा टॉकीज, सिध्दांत ऊर्फ भाऊ राजु डाडर आरोळेवस्ती यांचे विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्रा सारखे घातक शस्त्र जवळ बाळगुन गैर कायदयाची मंडळी जमवुन  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन अनुसुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय नोकर करत असलेल्या कामात अडथळा निर्माण करुन त्यांस शिवीगाळ दमदाटी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून खंडणी मागण, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच अग्णीशस्रासारखे घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे विविध कलमान्वये गुन्हे केल्याने जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. 

     

आरोपींविरोधात जामखेड पोलीसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व कलम ५६ अन्वये  पोलीस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी कर्जत यांचेकडे तडीपार प्रस्ताव सादर केले. प्रस्तावांवर  पोलीस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी कर्जत विभाग यांनी सुनावणी घेवून सदर प्रस्तावातील आरोपी न तुषार हनुमंत पवार  रा. जांबवाडी ता. जामखेड,  अक्षयकुमार अभिमान शिंदे  रा. पोकळेवस्ती ता. जामखेड, किरण ऊर्फ खंडया रावसाहेब काळे रा. मिलींदनगर ता. जामखेड, सिध्दांत ऊर्फ भाऊ राज डाडर  रा. आरोळेवस्ती ता. जामखेड, यांना अहमदनगर जिल्यातून व आरोपी  रमेश राजेंद्र काळे  रा.गोरोबा टॉकीज जवळ ता. जामखेड यास , बीड व सोलापुर जिल्यातून तसंच आरोपी  नितीन रोहीदास डोक रा. गोरोबा टॉकीज शेजारी ता. जामखेड यास अहमदनगर, नाशीक, बीड व संभाजीनगर जिल्हयातुन प्रत्येकी एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. 

     

तडीपार केलेल्या आरोपींपैकी कोणी आरोपी इसम तडीपार केलेल्या कार्यक्षेत्रात वावरत आल्यास जामखेड पोलीस स्टेशन फोन क्र. ०२४२१ – २२१०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच रेकॉर्डवरील इतर दहा ते बारा गुंडांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे , यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोहेकॉ. बिरप्पा करमल, पोहेका. अजय साठे, पोकों. अमोल आजवे, पोकों. सचिन पिरगळ, पोकॉ. दत्तु बेलेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here