जामखेड शहरात गुन्हेगारी पोलिसांच्या आशीर्वादाने वाढल्याचा जनतेचा आरोप ..जामखेड पोलिसांवर वरिष्ठांचा धाक राहिला नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा
जामखेड तालुका प्रतिनिधी
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड शहराची ओळख आहे मात्र याच शहरातील जामखेड बसस्थानका समोर राजरोसपणे काही महीला वेश्या व्यवसाय करत आहेत. सदरचा वेश्याव्यवसाय हा बस स्थानका समोरील लॉज मध्ये खुलेआम सुरु आहे. मात्र जामखेड पोलीस वेड्याचे सोंग का घेतात हे पोलिसांना दिसत नाही का? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. बस स्थानक परिसरातील महिला प्रवासी व नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जामखेडमध्ये सर्व अवैध धंदे खुलेआम चालू आहेत . वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड शहराची ओळख आहे. त्यामुळे जामखेड बसस्थानकात रात्रंदिवस एस टी बस व प्रवाशांची वर्दळ असते. नावाजलेल्या या जामखेड बस स्थानका समोरील चहाच्या टपरीवर देहविक्री करणार्या काही महीला थांबलेल्या असतात. याठिकाणी एखादे ग्राहक आले की त्या महिला ग्राहकांना. हसुन, इशारे करून आकर्षित करतात व बस स्थानका समोरील असलेल्या लॉज मध्ये भरदिवसा घेऊन जातात देहविक्रीचा व्यावसाय दिवसाढवळ्या खुलेआम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहे पोलीस बघुन पुढे निघुन जातात
बस स्थानका समोर चाललेल्या या खुलेआम वेश्या व्यवसाय पोलिसांना दिसुन येत नाही का जामखेड चे पोलीस झोपले आहेत का ? का पोलीस मुद्दामहून झोपेचे सोंग घेतात का? स्थानिक पोलिसांकडून‘अर्थपूर्ण’गोष्टीमुळे दुर्लक्ष केले जात आहे. या वेश्या व्यवसायामुळे परीसरातील प्रवासी वैतागून गेले आहेत. जामखेड शहर सह येथील इतर लॉजवर देखील अनेक प्रकार घडत आहेत कलाकेंद्राच्या महिला बाकीच्या लॉज वर खुलेआम वेश्या व्यवसाय करत आहे व कलाकेंद्र मध्ये अंधारातुन वेश्या व्यवसाय सुरू आहे मग पोलीस बघून न बघितले सारखे का करतात? पोलीस लॉज हॉटेल वर कारवाई का करत नाही? त्यामुळे शहरासह तालुक्यातील लॉजची देखील योग्य तपासणी करून जर या ठिकाणी काही अवैध प्रकार दिसुन आला तर कारवाई करण्यात यावी गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरीकांन कडुन होत आहे
दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तालुक्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे याबाबतची सत्य माहिती जनतेसमोर उजेडात आणली आणि मग पोलीस यांना तालुक्यातील धंदे बंद आहेत असे जनतेला दाखविणे गरजेचे झाले. पण खरोखरच सर्व अवैध धंदे बंद केले तर मग यातून मिळणाऱ्या वर कमाईचे प्रचंड उत्पन्न बंद होणार ! त्यामुळे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांबरोबर एक नवे नाटक सुरू केले आहे. अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची, त्याला धंदा बंद कर असे सांगायचे आणि पुन्हा आतून त्याला गुपचुप चालू ठेव असे पण सांगायचे. म्हणजेच पोलिसांनी मारल्यासारखे करायचे आणि अवैध धंदेवाले ओरडल्यासारखे करायचे !
मटका, जुगाराचे क्लब आणि बाजारच्या दिवशी झटपट मटका या अवैध धंद्यांना जामखेडमध्ये नुसता उत आलेला आहे आणि हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना चोरून लपून का होईना जिवंत ठेवायचे आहेत. अवैध धंदे बंद झाले तर मग ‘हप्ता’ बंद होईल, मग एवढी शक्ती पणाला लावून आपण आपली बदली जामखेड पोलिस स्टेशनला करवून घेतली आहे, मग त्याचा उपयोग काय?
जामखेड शहर व तालुक्यात मटका खुलेआम चालू आहे याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सर्व मटका चालकांनी दुकाने एक देखावा म्हणून बंद केली पण मटक्याचे आकडे फोनवर आँनलाईन पध्दतीने घेतले जात आहे. दुकान बाहेरून बंद दाखवून काय मटका किंग ग्राहक आले की दुकान उघडून ग्राहकाना आत मध्ये घेतात व दरवाजा बंद करून घेतात असा पण मटका किंगने मार्ग काढला आहे.