जामखेड मध्ये तरूणावर कोयता व चाकुने हल्ला

0

तरूण गंभीर जखमी, शहरात पसरली मोठी दहशत , चारही आरोपींना अटक आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी

जामखेड तालुका प्रतिनिधी 

जामखेड शहरात दुध घालुन घरी जात असताना आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर अडवुन युवकावर अचानक हल्ला करत कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांनविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही हल्लेखोरांना जामखेड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे चारही आरोपींना आज दि. १२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. 

या प्रकरणी आरोपी प्रमोद प्रविण घायतडक रा. कोल्हेवस्ती, सलमान आत्तार (पुर्ण नाव माहीत नाही), रोहित शिवाजी गायकवाड, व चॉंद नुर उर्फ आयन शेख तिघे रा. जामखेड आशा एकुण चार जणांनवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघा आरोपीच्या मुसक्या आवळुन अटक केली आहे 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की फीर्यादी अशोक रतन म्हस्के वय २३ वर्षे रा. कोल्हेवस्ती, जामखेड हा सोमवार दि १० रोजी सायंकाळी जामखेड शहरात डेअरी मध्ये दुध घालुन मोटारसायकल वरुन आपल्या कोल्हे वस्ती येथे घरी चालला होता. यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकाना समोर आरोपींनी फीर्यादी अशोक म्हस्के याची मोटारसायकल आडवुन गाडीची चावी काढुन घेतली. 

यावेळी फीर्यादीने विचारले की मला का थांबवले आहे असे म्हणताच आरोपी प्रमोद घायतडक त्यास म्हणाला की तु येता जाता माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतो आज तुझी मस्ती जिरवतो असे म्हणुन फीर्यादीच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले तर आरोपी नं दोन याने हातातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फीर्यादीच्या कंबरेत चाकुने वार केले तर आरोपी नंबर तीन व चार यांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी फीर्यादीस बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फीर्यादी आशोक महस्के हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. 

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चारही आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी सपोनि वर्षा जाधव ,हे.कॉ. प्रविण इंगळे, पो.ना.जिंतेद्र सरोदे, पो. ना. संतोष कोपनर, पो. कॉ. प्रकाश मांडगे, पो. कॉ. घोळवे, पो. कॉ. देविदास पळसे

 यांनी  तात्काळ सापळा रचुन आरोपींचा शोध घेत पोलिसांनी आरोपींना पकडले व  अटक केली असुन चारही  आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here