झाकडे वन परिक्षेत्रामध्ये वणवा लावणारा अटकेत

0

पाटण : झाकडे (ता. पाटण) या राखीव नक्षत्रामध्ये वणवा लावणाऱ्या नितीन साळुंखे याला सापळा रचून सातारा वन विभागाने ताब्यात घेतले. नितीन साळुंखे वणवा लावत असताना आढळल्याने त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे यांनी सांगितले की पाटण वनपरिक्षेत्रातील दाट वनराई असणाऱ्या झाकडे वनक्षेत्रामध्ये अज्ञाताकडून वारंवार वणवा लावला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या.

त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला असता संशयित नितीन साळुंखे वणवा लावत असताना आढळून आला. त्याने जंगलात दोन ठिकाणी वणवा लावला होता. तिसऱ्या वेळेस वणवा लावताना रोहित लोहार या वनरक्षकाने पाळत ठेवून त्याचे मोबाइलवरुन चित्रिकरण केले. दोन ठिकाणी लावण्यात आलेले वणवे ग्रामस्थांनी वेळेत विझवले.

त्यामुळे मोठे वनक्षेत्र जळण्यापासून वाचले. साळुंखे याच्यावर पाटण पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई साताऱ्याच्या उपनसंरक्षक आदिती भारद्वाज, वनीकरण विभागाचे सहाय्यक वनरक्षक महेश झांजुर्णे, पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here