ढोरकीन शिवारातील एका शेतांमधून २२ गांजाचे झाडं जप्त

0

पैठण,(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारातील एका शेतामध्ये गांजाचे झाड लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्याने सोमवार(दिं.३०)  रोजी दुपारी पैठण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख व एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे पाटील यांनी महसूल व पोलीस पथकासह  छापा टाकून  २८ किलो वजनाचे २२ गांजाचे झाड जप्त केल्याची कारवाई केली . 

   

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ढोरकीन येथील शिवारातील शेतकरी मच्छिंद्र रावसाहेब मुळे यांची शेती गट क्रमांक १२५/१ यामध्ये गांजाचे झाडाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय खबर एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे व पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचून सदरील ढोरकिन येथील शेतात जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी गांजाचे झाड लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून या शेतात लावण्यात आलेले २२ गांजाचे झाड वजन २८ किलो जप्त करण्याची कारवाई करत २ लाख ८९ हजार  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र मुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री पर्यंत सुरू होती. सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे 

यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पाटील, पोलिस जमादार राजेश चव्हाण,कर्तारसिंग सिंगल, दिनेश दाभाडे, गणेश खंडागळे, कृष्णा उगले, राजेश सोनवणे, राहूल मोहोतमल, घोडके यांनी केली.

——–

ढोरकीन परीसरात एका शेतातील कपाशी व तुरी मध्ये गांजाची झाडे लावल्याची गुप्त माहिती पोलीस जमादार राजेश चव्हाण यांना कळाली त्यांनी सदर माहिती सपोनि ईश्वर जगदाळे पाटील यांना कळवून सदर ठिकाणी तात्काळ कारवाई केली असता तेथे बावीस गांजाचे झाडे आढळून आली एकूण २८ किलो गांजा किंमत २ लाख ८९ हजार ७०० रूपयाचा गांजा सरकारी पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून पुढील तपास सपोनि ईश्वर जगदाळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here