…..त्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साताऱ्यात उद्या फाशी देणार : रिपाईचा एल्गार ! 

0

सातारा/अनिल वीर : नागपूरमध्ये शेतमजूर महिलेवरती अमानुषरित्या अत्याचार करून तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या क्रूरकर्मा अत्याचारित नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी मंगळवार दि.२३ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन होणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.

      निषेध आंदोलन रिपब्लिकन पक्षाचेजिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली फाशी देणार आहे. अशीही माहिती महिला आघाडीच्या पूजा बनसोडे आणि संगीता शिंदे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील थापा पोलीस स्टेशन सुरेवाणी गावामधील एक शेतमजूर महिला कापूस वेचण्याकरता शेतामध्ये गेली असता ती एकटी आहे. असे पाहून त्याच भागातील दिनेश उईके, नंदकिशोर उईके व सिद्धार्थ पाटील यांनी तिला शेतामध्ये एकटेच गाठून तिच्यावरती अमानुषरित्या अत्याचार करून बदनामी होईल म्हणून संबंधितांनी कुऱ्हाडीचा घाव घालून तिची हत्या केले होती. शिवाय तिच्या मृतदेहाचीसुद्धा विटंबना केली होती.निषेध म्हणून प्रशासनाने या नालायक व नराधमांना त्वरित फासावर लटकावे. या मागणीसाठी निदर्शने करून त्या नराधवांच्या प्रतिक्रमात्मक पुतळ्यास फाशी देण्यात येणार आहे. तेव्हा शासनाने हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून दोषींना त्वरित फासावर लटवावे. यावेळी अमृता मोरे ,स्मिता जगताप, दामिनी निंबाळकर, सोनाली रणदिवे, उषा गायकवाड, विजया गायकवाड,  राधिका बडेकर,सविता संकपाळ,मीना कुंटे आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here