दहिवडीत अभियंत्यासह दोघे लाचप्रकरणी जाळ्यात; तक्रारदाराकडे २० हजाराच्या लाचेची मागणी

0

दहिवडी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साेमवारी माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यासह दोघांवर कारवाई करण्यात आली.
बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने उकिर्डे (ता.माण) येथील जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केले आहे. त्याचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी बांधकाम विभाग, उपविभाग दहिवडी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव (वय ५४, रा. दहिवडी) यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

यापैकी १५ हजार रुपये लाच रक्कम खासगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे (वय ६१, रा. बिदाल, ता. माण) यांच्या मार्फतीने पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालय, दहिवडी या कार्यालयात स्वीकारली. त्यामुळे भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे व गणेश ताटे यांनी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here