दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 

0

गोंदवले – नऊ महिन्यांपासून फरारी असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या आरोपीस वाळुज, जिल्हा संभाजीनगर येथून शीताफिने पकडून अटक करण्यात आली.दहिवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 5/2024, ipc 363 प्रमाणे अल्पवयीन पीडित मुलगी राहणार पांगरी हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले बाबत गुन्हा दाखल होता.

या अनुषंगाने अधिक माहिती प्राप्त करून सदर अल्पवयीन मुलीस वैभव किसन गायकवाड राहणार पांगरी याने पळवून घेऊन गेले बाबतची माहिती प्राप्त केली. परंतु गुन्हा घडल्यापासून सदरचा आरोपी हा नऊ महिने फरार होता. काल रोजी सदर आरोपी हा वाळूज एमआयडीसी, जिल्हा संभाजीनगर येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे प्राप्त करून सदर ठिकाणी पोलीस स्टाफ पाठवून आरोपी नामे वैभव किसन गायकवाड व अपहरित मुलगी राहणार पांगरी यांना ताब्यात घेतलेले असून आरोपी वैभव किसन गायकवाड याला या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ,महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे,पोलीस हवालदार रवींद्र खाडे,महिला पोलीस नाईक नीलम रासकर,पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट,पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे, आदी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here