पाचगणी : प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी पाचगणीतील तीन पानटपर्यांवर छापे टाकून, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 16 हजार 225 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचगणीतील दिलखुश पान शॉप आणि गोल्डन जनरल स्टोअर (एसटी स्टँडजवळ), अप्सरा पान शॉप (अप्सरा हॉटेलजवळ) येथे सातारच्या अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती प्रियंका नामदेव वायकर (वय 31) यांच्या पथकाने छापे टाकून विमल पानमसाला, टोबॅको (पिवळी), रॉयल 717 फ्लेवर टोबॅको, हिरा पानमसाला, रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, रॉयल जाफरानी जर्दा तुलसी असा 16 हजार 225 रुपये किमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी शकूर मोहम्मद केरलावाला (वय 50), अशोक यशवंत जानकर( वय 60) आणि मोहम्मद ओईस के (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सोमदे तपास करत आहेत.