बंद घराचा दरवाजा तोडून रोख रक्कम आणि मिक्सर चोरट्यांनी केला लंपास

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात भामट्याने घरातील रोख रक्कम व मिक्सर पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी उघडकीस आली. 

               मिरा गोरक्षनाथ थोरात, वय ३५ वर्षे, या राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे राहत आहेत. दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी मिरा थोरात या घराला कुलुप लाऊन राहुरी येथे मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आरडगाव येथे त्यांच्या घरी गेल्या. 

तेव्हा त्यांना घराचा दरवाजा तोडलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहीले असता घरातील सामानाची उचकापाचक केलेली दिसली. तसेच कपाटातील लाॅकर तोडुन त्यामधील १५ हजार रुपए रोख रक्कम व घरातील मिक्सर चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

               घटनेनंतर मिरा गोरक्षनाथ थोरात यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ९७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here