बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

0

ठाणे : बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा रुग्णालयातून घेऊन जात अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. गोळीबारानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेला नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे पोलिसांनी अशी माहिती दिली की, “बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याने, पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या गाडीतच गोळीबार केला.” “या चकमकीत पोलिसही जखमी झाले होते, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याला उपचारांसाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,” असं पोलिसांनी सांगितले.

 

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

 बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) एन्काऊंटर (Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. पण खरं काय आहे हे अजून तरी समोर आले नाही. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here