सातारा : बांधकाम व्यवसायिक विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी आरोपीना कडक शासन करून फासावर लटकवावे.
दि.१४ रोजी सिंहगड परिसरामध्ये सकाळी फिरण्यास पोळेकर गेल्यानंतर त्यांचे अपहरण झाले होते.पंधरा रोजी त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती.परंतु त्या अगोदरच त्यांच्या गाडीसह एक कोटीची खंडणी मागितली होती. संबंधित काही आरोपींना मध्यप्रदेश जबलपूर इथून अटक केलेली असली तरी या आरोपींमध्ये रोहित भामे,शुभम सोनवणे,मिलिंद थोरात व त्यांचा मास्टरमाईंड बाबू बामे हा प्रसार आहे.
तरी संबंधित आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी. विठ्ठल पोळेकर यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. त्यामुळे आरोपी हे सराईत असल्याचे निष्पन्न होत आहे. सदरच्या प्रकार रोखण्याकरता रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व मदन खंकाळ यांनी दिला आहे.यासंदर्भात,निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.