बायकोचा खून करून फरार आरोपी नवऱ्यास पैठण पोलिसांनी केले जेरबंद !

0

पैठण : बायकोचा फावडयाने क्रुरपणे मारहाण करुन खुन करुन फरार झालेल्या आरोपी नवऱ्यास पैठण पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की मंदाबाई ज्ञानेश्वर पोळ, वय २८ वर्ष हिला तिचा नवरा ज्ञानेश्वर पुंडलीक पोळ, भवानीनगर, नविन कावसान, पैठण, ता. पैठण याने मागील तीन वर्षापुर्वी पासुन सतत तिच्यावर संशय घेवुन मारहाण करुन शिवीगाळ करुन, जिवे मारण्याच्या धमक्या देत होता . दिनांक ०६/१२/२०२२ रोजी सकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास नेहरु चौका जवळ रोडवर तिच्यावर फावडयाने वार करुन डोक्यात मारुन तिला जिवे ठार मारल्याची तक्रार मयत महिलेची बहीण सौ. इंदुबाई विष्णु बर्फे, वय ३५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. संतोषी माता मंदीर जवळ, पावर हाऊस, अंबेडकर चौक, पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद. हिने पोलीस स्टेशन पैठण येथे दिनांक ०६ / १२ / २०२२ रोजी दिली होती. पैठण पोलीस ठाण्यात वरील फिर्यादवरुन कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ भादंवि प्रमाणे दाखल झालेला असुन सदर गुन्हयातील आरोपी गुन्हा करुन घटनास्थळावरुनच फरार झाला होता.
पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया आणि ईतर वरीष्ठांच्या आदेश व मार्गदर्शाप्रमाणे आरोपीचा शोध घेण्यासाठी पैठण पोलीसांनी वेगवेगळे ०५ तपास पथक स्थापन करुन आरोपीचा औरंगाबाद, अहमदगनर, बीड, जालना जिल्हयात वेळोवळी शोध घेतला, आरोपीचे छायाचित्रासह जवळपास २५० शोध पत्रिका आणि १०० फोटोग्राफ्स वाटप करुन पैठण, पाटेगाव, बिडकीन, शेंदुरवादा, शहागड, गुळज, परळी, आष्टी, चिकलठाणा, करमाड, बदनापुर, अंबड, मोजपुरी, शेवगाव, मुंगी, पाथर्डी येथे वेळोवेळी शोध घेतला होता. तसेच आरोपी हा मजूर कामगार असल्याने परिसरातील जवळपास १५० विटभट्या तपासल्या, हॉटेल, ढाबे, बाजार, गर्दीचे ठिकाण, कारखाने, स्टोन क्रेशर, ट्रान्सपोर्ट कंपनी, आरोपीचा शोध घेण्यासाठी गुप्तबातमीदार नेमुन बक्षिस जाहीर केले. यादरम्यान आरोपीचा शोध घेत असताना दिनांक १०/०१/२०२३ रोजी गुप्तबातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीस जालना शहर परिसरातुन ताब्यात घेवून तब्बल एक महिन्याच्या शोध मोहिमेनंतर आरोपीस अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्ष मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक लांजेवार, औरंगाबाद ग्रामिण, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पंठणच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उप निरीक्षक मदने, भोसले, बुरकूल, पोहेकॉ महेश माळी, सुधीर ओव्हाळ, नुसरत शेख, भगवान धांडे, लक्ष्मण पुरी,नरेंद्र अंधारे, संदिप जाधव, पोना गोपाल पाटील, राजेंद्र जिवडे, पोकॉ सचिन आगलावे, संजय चव्हाण,भाऊसाहेब वैदय, कृष्णा दुबाले, संजय राठोड, बाबासाहेब शिंदे, अंकुश शिंदे आदींनी आरोपी शोध कामी विशेष परिश्रम घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here