बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगल्याने न्हावा शेवा पोलीस ठाणे मार्फत आरोपीस अटक.

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )

दि. २७/११/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने एक इसम विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूलसह पनवेल तालुक्यातील मौजे गव्हाण गावाचे स्मशानभुमीचे परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे यांनी ताबडतोब सदरील माहिती न्हावा शेवा बंदर विभाग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिल्यावर त्यांचे सुचनेवरून पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार महेंद्रसिंग राजपूत, पोलीस हवालदार शिवाजी बसरे, पोलीस हवालदार संजय सपकाळ व पोलीस नाईक विशाल हिंदोळा यांचे विशेष पथक तयार करून सदरील बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमाचा शोध घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सापळा लावला व सदर इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस डावे बाजूस पॅन्टचे आतमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. सदरचे पिस्तूल बेकायदेशीर पणे त्याने जवळ बाळगले म्हणून त्याचेवर न्हावाशेवा पोलीस ठाणेत गु.र.नं. २२३/२०२३ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजय बलवान सरपटा वय २२ वर्षे, धंदा नोकरी, रा. साईनगर वहाळ, ता. पनवेल, जि. रायगड असे आहे.सदर आरोपी जवळ ३५,०००/- रू किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, ज्याचे ग्रीपचे दोन्ही बाजूस लाकडाची मुठ असलेली पटटी स्कूने फिट केलेली, त्यामध्ये काळया रंगाचे मॅग्झीन त्यामध्ये ०२ जिवंत काडतूस आढळले आहे. १,२००/- रु किंमतीचे ०२ जिवंत काडतूस त्याचे पाठीमागील बाजूस KF 7.65 असे लिहलेले प्रत्येक काडतुसाची किंमत ६०० रू.आहे.सदर उल्लेखनिय कामगिरी मिलींद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, पंकज डहाणे  पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ पनवेल, धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संजीव धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावाशेवा पो. ठाणे यांचे देखरेखीत न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  नितीन सांगळे, पोलीस हवालदार महेद्रसिंग राजपूत,पोलीस हवालदार शिवाजी बसरे, पोलीस हवालदार संजय सपकाळ व पोलीस नाईक विशाल हिंदोळा यांनी केली आहे.सदर आरोपी शस्त्र विकण्यासाठी परिसरात आल्याचा संशय पोलिसांना आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र जवळ बाळगणे व विकणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे सदर आरोपीचा न्हावा शेवा पोलिसांमार्फत कसून चौकशी सुरु आहे. पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी या केलेल्या धाडसी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here