कराड गँगने याच कंपनीकडे मागितली होती खंडणी; संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आली अवादा कंपनी
बीड : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवादा कंपनीचं नाव समोर आलं. या कंपनीकडे वाल्मिक कराडची गँगने खंडणी मागितली होती. खंडणी प्रकरणात आरोपी सध्या जेलमध्ये आहे. पण याच कंपनीनेमध्ये आता चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 7 लाखांचा माल चोरीला गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग इथं आवादा कंपनीने आपला प्लांट उभारला आहे. पण या प्लांटमधून पाच लाख रुपये किंमतीच्या केबलची चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी केबल गायब केली. ही घटना १० मार्चच्या दरम्यान घडली होती. पण कंपनीचे अधिकारी रजेवर होते. जेव्हा हे कंपनी प्लांटमध्ये आले तेव्हा केबल चोरीला गेल्याची बाब समोर आली.
कंपनीतून केबल चोरीला गेल्यानंतर आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. पण या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. अखेरीस आता या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.