महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटक मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी तौफिक इस्तियाक अहमद (वय ४०, रा. नयापुरा, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ७४, ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी न्यायालयात हजार केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पुणे येथून महाबळेश्वर पर्यटनासाठी कुटुंबासमवेत आलेली मुलगी ही बाजारपेठेत खरेदी करत असताना या मुलीचे मालेगाव येथून पर्यटनास आलेल्या एकाने मोबाइलमध्ये फोटो काढले. तो आपले फोटो काढत असल्याचे मुलीच्या निदर्शनास येताच रडत या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना कुटुंबीयांनी दिली होती.