देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरात घुसुन माझ्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घ्या अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली व तुम्ही माझ्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. गळ्यातील मंगळसुत्र ओरबडून नेल्या प्रकरणी विजय अण्णासाहेब मकासरे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर मकासरे यास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या विरोधात मकासरे सातत्याने वरीष्टांकडे तक्रार करीत असल्याने त्याच्या अटकेला महत्व प्राप्त झाले आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका महिलेच्या घरात विजय अण्णासाहेब मकासरे घुसुन त्या महिलेच्या पतीच्या नावे शिवीगाळ करुन तुझा नवरा कुठे आहे.अशी विचारना करुन माझ्या विरोधात ज्या तक्रारी दाखल केल्या आहेत.त्या तक्रारी मागे घ्या नाहीतर तुम्हाला माहित आहे माझे लांब लांब संपर्क आहेत. माझी पत्नी पण नोकरीला आहे. तुमचे काय करायचे ते मी पाहिल अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली व तुम्ही माझ्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली तसेच गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेऊन गेला.
राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 77/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 119, 333, 115, 352, 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात विजय मकासरे यास अटक करण्यात आली आहे.राहुरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहा पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, सम्राट गायकवाड आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
सामाजिक कार्यकर्ता विजय मकासरे यांला राहुरी पोलीसांनी एका महिलेच्या केली फिर्यादीवरून अटक राहुरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. विजय मकासरे हे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कारभारा विषयी वरीष्ठांकडे कायम तक्रारी करत असल्याने मकासरे यांच्या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.