६ जणांसह ५-६ अनोळखी इसमांवर गुन्हा
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
आपल्यावर करण्यात आलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. शिवाय आपण जखमी झालो तेव्हा हल्लेखोर हे याच्या डोक्यात मारा,आज सोडायचे नाही असे म्हणत होते.असे आपण ऐकल्याचे देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितल्याने ६ जणांसह ५-६ अनोळखी इसमांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सत्यजित चंद्रशेखर कदम, वय ४३ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी पंढरपूरला जाणारी दिंडी गावात मुक्कामी आली होती. नेहमीप्रमाणे आम्ही त्यांना जेवण केलेले होते. मी व माझा सहकारी मंगेश ढूस हे आमच्या वाहनातून गावात जात असताना विश्वकर्मा चौकात काही युवकं मुद्दाम महिलांना घेवून मुलांसोबत भांडण करत होते. तेव्हा भांडण सोडवण्यासाठी आपण तेथे गेल्यावर संबंधित लोक हे कट करून थांबलेले असताना त्यातील एकाने धारदार हत्याराने व लोखंडी रॉडने आपल्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात रॉड मारून गंभीर जखमी केले.
आपल्याला भोवळ आल्याने आपण रक्तभंबाळ होवून खाली पडलो. तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी आपल्या गळयातील ५ तोळयाची सोन्याची चैन काढून घेतली. आपल्याबरोबर असणारा मंगेश ढुस यालाही मारहाण केली. मारहाण करत असताना याचे डोक्यातच मारा,आज याला सोडायचे नाही, असे ते म्हणत होते. असे कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून त्यांच्या फिर्यादीवरून मयूर विजय पवार, आदित्य अशोक बर्डे, खंड्या उर्फ विजय इथापे, काळया उर्फ राजेंद्र भाऊसाहेब बर्डे, राहुल माळी, सविता विजय पवार यांच्यासह ४ ते ५ पुरूष आणि ५ ते ६ महिला यांच्याविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.