माळशिरस : माळशिरस लोकसेवक संजय बाबुराव फिरमे, वय ५४ वर्षे, मंडळ अधिकारी, माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अशी १७,६३,७६७/- रू. किंमतीची अपसंपदा संपादित केल्याचे व त्यांची पत्नी नावे सौ. संध्या संजय फिरमे यांनी लोकसेवक संजय बाबुराव फिरमे, यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे अपसंपदेचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा नोंद क्रमांक सोलापूर युनिट, पुणे परिक्षेत्र. सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर गु.र.नं. ५२४/२०२४ कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (१) (इ) सह १३ (२) तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (ब) सह १३ (२) सह भा. द. वि. कलम १०९ प्रमाणे आरोपीचे नांव व कार्यालय १. संजय बाबुराव फिरमे, वय ५४ वर्षे, मंडळ अधिकारी, माळशिरस जिल्हा सोलापूर २. सौ. संध्या संजय फिरमे, वय ५२ वर्षे, दोघे रा. ५८ फाटा, श्रीनाथ नगर, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर अपसंपदा कालावधी दि.०६/०४/१९९८ ते ३०/०९/२०१७ गैर-मालमत्ता १७,६३,७६७/- रु., अपसंपदा टक्केवारी २२.२९ %
थोडक्यात माहिती यातील आरोपी लोकसेवक संजय बाबुराव फिरमे, मंडळ अधिकारी, माळशिरस यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती. परंतु, त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, पत्नी सौ. संध्या संजय फिरमे यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू.१७,६३,७६७/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत २२.२९% जास्त असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले आहे.
सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी आरोपी लोकसेवक संजय बाबुराव फिरमे यांना त्यांची पत्नी सौ. संध्या संजय फिरमे यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे. म्हणून त्या दोघांचे विरूध्द वरीलप्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशी अधिकारी १) चंद्रकांत कोळी तत्कालीन पोलीस निरीक्षक, नेम. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर. तपास अधिकारी २) उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, नेम, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर. मार्गदर्शन अधिकारीगणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे. सोलापूर डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत
काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.