मा. आ. भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

0

मध्यराञी निवासस्थानावरुन अटक; उपचारानंतर न्यालयात केले हजर

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

          श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक सहकारी बँकेचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे (वय 82 वर्ष) यांनी एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातमोठी खळबळ उडाली आहे. तर राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेवून अटक केली आहे. उच्च रक्तदाबाचा ञास झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी 3 वा राहुरी न्यायालयात हजर केले न्यायालयाचे कामकाज उशिरा पर्यंत चालु असल्याने कोर्टाचा निर्णय समजु शकला नाही.

              राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी द. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत म्हटले आहे की. तुला बंगला घेवुन देतो, मुलाला नोकरी मिळून देतो असे आमिष दाखवून तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला मादक पदार्थ देऊन श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली आदी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी संबंधित महिलेवर अत्याचार केला .

               

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर १०७०/२४ आयपीसी ३७६ (२) एन ३२८, ४९८, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत त्या महिलेने म्हटले आहे की,१० एकर शेती घेऊन देतो, बंगला बांधून देतो असे अमिष दाखवून २०१९ ते २०२३ पासून तिच्यावर श्रीरामपूर, मुंबई, दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे दिलेल्या  महिलेने म्हटले आहे. महिलेने राहुरी पोलीस ठाणे गाठत रात्री १० वाजें दरम्यान केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो असे पुरावे दाखवल्याने पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदार मुरकुटेंना अटक करताच कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्याते राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हि घटना काय वळण घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे .

          राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या नंतर मुरकुटेंचा शोध घेतलाअसता मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मध्यराञी 2;30 च्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानाच्या गँलरीत प्रवेश करुन ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणुन चौकशीनंतर अटक करण्यात आली.

             

अटकेनंतर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पोलिसांनी  नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.उपचारा नंतर सकाळी 11;30 वाजता राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.मुरकुटे यांना पोलिस ठाण्याच्या जेल मध्ये ठेवण्यात आले.दुपारी 2;50 वा.राहुरी न्यालयात हजर करण्यासाठी जेल मधुन बाहेर काढण्यात आले.3 वा.राहुरी न्यायालयात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात न्या.आदित्य शिंदे यांच्या समोर हजर केले असता न्यायालयात राञी उशिरा पर्यंत युक्तीवाद सुरु असल्याने न्यायालयाने काय आदेश दिले हे समजु शकले नाही.

                 मुरकुटे यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी ती महिला एका बँकेत नोकरी करीत असुन पिडीत महिलेने मुरकुटे हे अनेक दिवसापासुन ञास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यामागे जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याने हात असुन या प्रकरणाला बळ दिल्याची नगर जिल्ह्यात मोठी चर्चा.मुरकुटे यांनी काही दिवसांपूर्वी एक एका सत्ताधारी राजकीय नेत्याच्या विरोधात राजकीय भाष्य केले होते. त्यामुळे या सत्ताधारी नेत्याने या महिलेस गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय पाठबळ दिले असल्याची चर्चा सुरु आहे. माजी.आ.मुरकुटे यांच्या बाजुने सुमारे एक तास युक्तीवाद करण्यात आला. अँड सुभाष चौधरी,तवले,पाटील यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने अँड श्रीमती गांधले व अँड रविंद्र गागरे यांनी बाजु मांडली.

         

राहुरीत दाखल बलात्कार प्रकरणात अटक झाल्याची माहिती समजताच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर,अंजुम शेख, सचिन पटारे, सनी काळे, गणेश छल्लारे,ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह राहुरी पोलिस ठाणे व न्यायालयाच्या आवारात शेकोडो कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मुरकुटे यांना या प्रकरणात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची काही राजकीय संबंध आहे का? २०१९ पासून अत्याचार होत असतांना महिलेने पाच वर्षे थांबुन आत्ताच का फिर्याद दिली ? तिला कोणी तक्रार देण्यासाठी सांगितले का? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here