सातारा : मेढा वन विभागाकडून अवैध खैराची वाहतूक करणाऱ्या वाहन आणि चालकावर कारवाई करण्यात आली . यामध्ये मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 15 ऑक्टोबर 2024 रोजी वनाधिकारी यांना मिळालेल्या बातमीवरून मेढा महाबळेश्वर विनापरवाना वृक्षतोड करून व विना पास परवाना खैर प्रजातीच्या जळावू लाकूड मालाची वाहतूक करीत असताना पिकअप वाहन क्र. MH-08-H-7790 जप्त करून चालक किरण किसान सुर्वे वय 43 वर्षे रा. डांगरेघर तालुका जावळी जिल्हा सातारा २) संतोष पांडुरंग पार्टे वय 48 वर्षे राहणार केळघर तालुका जावळी जिल्हा सातारा लाकूड व्यापारी यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2) ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र मेढा तालुका जावळी या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेढा महाबळेश्वर रोडवर खैर प्रजातीचा विनापरवाना वाहतूक करीत असताना वन विभागाने कारवाई केली. सदर पिकअप खैर प्रजातीच्या मालासह जप्त करून पुढील तपास कामी वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा कार्यालयाच्या आवारात सदर वाहन चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. या कामी वनरक्षक मेढा यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक दि. 15-10-2024 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्रीमती आदिती भारद्वाज व सहा. वनसंरक्षक वनीकरण सातारा प्रदीप रौंदळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा. अर्जुन गंबरे सर वनपाल ,एन एन रजपूत सर व वनपाल अतिरिक्त ,एस डी चौगुले वनरक्षक ,राहुल धुमाळ वनरक्षक ,समाधान वाघमोडे वनरक्षक ,आकाश कोळी वनरक्षक ,विनायक लांडगे वनरक्षक ,नेताजी वासुदेव व कर्मचारी वर्ग यांनी केली.