महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्हिडिओ दाखवून देखील प्रशासन अजूनही गप्प; प्रशासनावर कोणाचा दबाव …… ?
गोंदवले – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी राणंद तलावातील माती उपसा करणाऱ्यांची दहशत मोडत वाळू चोरीचा पर्दाफाश करूनही प्रशासनाने अजून कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत सर्वांनीच या तलावातील काळ्या सोन्याच्या चोरीबाबत तोंडावर बोट ठेवलंय.शासनाच्या गाळमुक्त तलाव योजनेतून राणंद तलावातील गाळ उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परंतु गाळयुक्त शिवार करण्यासाठी मात्र या मोफत गाळ उपश्याबाबत शेतकऱ्यांना मातीचोरांच्या विरोधात लढावे लागत आहे.या तलाव परिसरातील राणंद,शेवरी,सोकासन भागातील शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा मातीचोरांच्या तावडीतून शेतीसाठी माती मिळेना.त्यामुळे ही योजना नेमकी कुणासाठी?मातीचोरीबाबत संपूर्ण माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी देऊन ही प्रशासन गप्प का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माती उपश्याबरोबरच राणंद तलावातील वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे व्हिडीओ मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तहसीलदारांना सादर केला.मात्र सध्या या तलावातील सर्व उपसा बंद असल्याचे सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत.परंतु प्रत्यक्षात मात्र रात्रीच्या वेळी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरूच असल्याचे पाहायला मिळतंय.त्याचे सुध्दा व्हिडीओ फुटेज उपलब्ध करून थेट प्रशासनाला दाखवून देखील अजून ही सगळी यंत्रणा शांत आहे शेतकऱ्यांना गाळापासून वंचित ठेवणाऱ्या व गौण खनिज चोरांना नेमकं पाठबळ कुणाचं?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.