दौड-रावणगाव, परशुराम निखळे :
दौंड तालुक्यातील मळद रावणगाव खडकी चिंचोली परिसरात झुगार मटका दारू धंद्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्रासपणे अवैध धंदेवाले यांनी अक्षरशः कहर केला असून सर्रास अवैध धंदे चालू असल्याने या भागात अवैध धंदेवाले यांनी झुगार मटका दारू आपली यांची दुकाने थाटली आहेत.
पुणे सोलापूर हायवे वरती रावणगाव खडकी चिंचोली येथे आपली दुकाने थाटली आहेत., अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. यावेळी रावणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने दौंड, रावणगाव पोलिसांचे काम संशयास्पद आहे.
दरम्यान अवैध धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा, पोलिस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नाहीत, कोण पोलिस आमचे कोणीसुद्धा काही करू शकत नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. जसे हाॅटेलचे मेनु कार्ड आसते तसे रावणगाव येथे बदली होऊन आलेल्या एका पोलिसकर्मचाऱ्याचे रेट कार्ड असल्याचे बोलले जात आहे. कुणी हप्ते दया आणि चालु करा अशी अवस्था आहे.
अवैध व्यावसायीकांनी तालुक्यातील काही प्रतिष्ठित लोकांना जवळ करून आपला धंदा जोमात थाटला आहे की काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच यांना लगाम नाही घातल्यास याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेस आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार आहेत. या बेकायदा अवैध धंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस प्रशाषण मात्र मूग गिळून गप्प बसले असून त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक राहिला नाही. या अवैध व्यावसायिकांच्या कृप्मुळे रावणगाव चौकीला एक वर्षा पुर्वी बदली होऊन आलेला पोलीस कर्मचारी आलीशान गाडी घेऊन फिरत आसतो. मुख्यालयातून छापा टाकण्यास आलेल्या पथकाचीही टीप स्थानिक अवैध व्यावसाइकाना देण्याचे काम हा कर्मचारी इमाने इतबारे करत असल्याची चर्चा आहे. आणि या लागेबांध्यामुळे रावणगाव चौकी समोरच दारू मटका चालु आहे.