राहुरीत वकिल दाम्पत्याचे अपहरण करून निर्घृण खूण… 

0

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात  ;बेपत्ता झालेल्या वकील दाम्पत्याचे दगड बांधलेले मृतदेह उंबरे येथिल  विहिरीत मिळून आले.; संशईत म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्याने खुनाचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन 

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे  

                  राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या आढाव दाम्पत्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला. ॲड. राजाराम जयवंत आढाव (५२) व ॲड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी व त्याचे ०३ साथीदार २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना यश मिळाले आहे.ताब्यात घेतलेले चौंघा पैकी दोन जण सराईत गुन्हेगार असल्याने या  खुनाचा खरा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन आहे.

          ॲड. राजाराम जयवंत आढाव, वय ५२ वर्षे, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, वय ४२ वर्षे, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड. राजाराम आढाव हे काल दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली आहे. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. पहाटे पोलिस पथक गाडी जवळ पोहचले तेव्हा त्यावेळी ॲड. आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभा होती. मात्र पोलिस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ॲड. आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू  ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले. 

          घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदिवे, रणजीत जाधव, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, सागर ससाने, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, संभाजी कोतकर आदी पोलिस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरीकोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत असतांना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसुन आले. सदर कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग रा. राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आले संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर सदर डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण दुशिंग व आणखी तीन जण अशा चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली. संशईत म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्याने खुनाचा मास्टर माईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन आहे.

             पोलीस पथकास किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता  त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर,  शुभम संजीत महाडिक रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी,  हर्षल दत्तात्रय ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर,  बबन सुनिल मोरे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचेसह कट करुन वकिल यांना कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यांना किरण दुशींग याने स्वतःचे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केलेबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले व त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे किरण दुशिंग याने पोलिसांना सांगितले.

 काही वर्षा पुर्वी अँड ताके यांचा नेवासा तालुक्यात जमिनीच्या वादातून खुन झाला होता. अँड मनिषा आढाव या आँड ताके यांची पुतणी असल्याचे समजते. अँड मनिषा आढाव यांच्या नावावर मोठी इस्टेट असल्याचे समजते. याच इस्टेटी वरुन सुपारी देवून हा खुन झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.पोलिसांनी पकडलेल्या दोन संशईत गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत. तसेच या दोघांची कोणतीही केस अँड आढाव दांपत्य यांच्याकडे नसल्याचे पुढे येत आहे.खुनाचे खरे कारण काय असु शकते या बाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here