राहुरी महाविद्यालयातील अल्पवयीन युवतीचे सिनेस्टाईल अपहरण 

0

राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथुन झाले अपहरण 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रीरामपुरातील सामूहिक अत्याचाराची घटना व  देवळाली प्रवरातील अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्येची घटना ताजी असतानाच  राहुरी कॉलेज मधील तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले आहे.हि घटना राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे.

             राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे  सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तीला चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १२ जून २०२४ रोजी घडली आहे. सदरील घटनेतील १७ वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी ही १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून ती कोल्हार परिसरात तीच्या कुटुंबासह राहते.

             दि. १२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ च्या  दरम्यान पिडीत मुलगी आई सोबत गवत घेण्यासाठी गेली होती. तेव्हा पिडीत मुलगी पूढे निघुन गेली व तीची आई, बहीण, भाऊ पाठीमागुन गवत घेवुन येत होते. त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीला बळजबरीने एका पांढऱ्या रंगाची टाटा मॅझीक गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करून पळवून नेले आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत प्रविण भोसले रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. याच्यावर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here