राहुरी शहरातील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;चारजण ताब्यात

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राहुरी शहरातील शनीचौक परिसरात मटका अड्ड्यावर राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून मटका चालवीणारे चारजण ताब्यात घेऊन गजाआड केले. 

         राहुरी शहरातील शनीचौक येथील शनी मंदिराच्या मागे जुगार अड्डा चालू असल्याची गुप्त खबर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार  सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, पोलिस शिपाई जयदीप बडे, नदिम शेख आदि पोलिस पथकाने शनी मंदिराच्या मागे छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी काहीजण मटका खेळवीताना आढळून आले. पोलिस पथकाने चार जणांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. 

           

पोलिस शिपाई नदिम शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी  आसिफ जमादार पठाण, वय ४५ वर्षे, रा. खाटीक गल्ली, राहुरी,  सागर गवराज जोगदंड, वय २४ वर्षे, रा. प्रगती विद्यालया जवळ, राहुरी, शरद संतोष साळवे, वय ३५ वर्षे, रा. राजवाडा राहुरी, स्वप्निल राजू गवळी, वय २९ वर्षे, रा. मुलनमाथा राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १२९७/२०२४ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here