नगर – नगर वेस वांबोरी, ता.राहुरी, जि.अहमदनगर येथे दि.06/04/2017 रोजी सकाळी 8.30 वा. दरम्यान आ.क्र.1) ज्योती उर्फ सुरेखा अनिल दळवी, रा.वांबोरी, आ.क्र.2) रामदास उर्फ रामभाऊ नाना पंडित रा.वांबोरी, आ.क्र. 3) अकिला महेबुब शेख रा.वांबोरी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने यातील मयत अल्पवयीन वय वर्षे 16 हिने पेटवून घेऊन आत्महत्या केली व तिने तिचे चुलते यांचेकडे वरील तिघांच्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतल्याचा मृत्यूपूर्व जबाब दिला, त्याहून मयताचे चुलते यांचे फिर्यादीहून राहुरी पोलिसांनी वरील तीन आरोपींचे विरोधात भा.द.वि.कलम 306, 323, सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी नुकतीच येथील जिल्हा न्यायालयात घेऊन तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपींतर्फे बचाव घेण्यात आला की मयताची नुकतीच 10 वी ची परिक्षा संपली होती व तिला पेपर अवघड गेले होते व त्या वैफल्यातून तिने स्वत:ला पेटवून घेतलेले आहे व वैयक्तीक हेव्यादाव्यातून फिर्यादीने खोट्या मृत्यूपूर्व जबाबाचा उल्लेख करुन आरोपींना त्रास देण्यासाठी खोटी फिर्याद दाखल केली. वरील बचाव ग्राह्य धरण्यात येवून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड.सतिशचंद्र सुद्रिक यांनी काम पाहिले.