शेततळ्यात बुडवून महिलेचा खून;चौघांना अटक. 

0

बारामती: मासाऴवाडी ता बारामती येथे शारिरीक व मानसिक छळ,करत एका महिलेचा निर्दयीपणे खून करण्यात आला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि.24/12/2023 मौजे मासाळवाडी ता. बारामती येथील मयत सुरेखा भाऊसाहेब गडदरे यांचा रहात्या घराजवळील शेततळ्यात ओढणीने हात बांधून,पाण्यात बुडवून खून करण्यात आला.  या प्रकरणी नामदेव बबन करगळ(मयताचे वडील) रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

या प्रकरणाची दखल घेत वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे कलम 302,304(ब),498(अ),34,सह हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी भाऊसाहेब महादेव गडदरे (पती) ठकुबाई महादेव गडदरे (सासू) मासाऴवाडी ता बारामती आशा सोनबा कोकरे(नणंद)सोनबा चंदर कोकरे रा. कुतवऴवाडी ता बारामती यांना अटक करण्यात आली आहे.  गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट बारामती न्यायालयाकडे रवाना करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान लवटे वडगाव निंबाऴकर पोलीस स्टेशन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here