दोरीने हातपाय बांधत,गळ्यावर वार करत मृतदेह विहिरीत आढळला
जालना प्रतिनिधी :
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप शिवारातील एका विहिरीत तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून मिळाली माहिती अशी की सिरसगाव मंडप येथील हारून युनुस शेख हे गुरुवारी दुपारी त्यांच्या शेतातील टिनपत्र्याच्या शेडमध्ये गेले होते.त्यावेळी त्यांना त्याठिकाणी रक्त पडलेले दिसले. तेथेच काहीतरी ओढत नेल्याची खूण दिसली.त्यादिशेने ते पुढे – गेले असता सोमनाथ सहाणे यांच्या विहिरीत काही तरी फेकल्याचे दिसले. त्यांनी सोमनाथ सहाणे यांना ही माहिती दिली असता सहाणे यांनी विहिरीत पाहणी केल्यानंतर घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण बिडवे,पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे,पोलिस कर्मचारी दादाराव बोर्डे,दांडगे यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी मयताचा मृत्यू देह विहिरीतून बाहेर काढला असता या ३५ वर्षीय तृतीयपंथी युवकाच्या गळ्यावर वार करीत हातपाय बांधून मृतदेह विहिरीत फेकल्याचा प्रकार समजला यामुळे हा मृत्यू देह उत्तर तपासणीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळाला पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांनी भेट देत पाहणी केली आहे.