देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
सोन्याच्या दागिण्यास पाँलीश करुन देतो अशी बतावणी करुन दुचाकी वरुन आलेल्या तरुणांनी वृद्ध दांपत्यास एक तोळ्याच्या दागिण्यास गंडा घातला.गंडा घालणारे दोघेही सीसीटिव्ही कँमेरात कैद झाले आहे. हि घटना राहुरी शहराजवळील बारागाव नांदुर रोड लगत असलेल्या आतार मळ्यात मंगळवारी दुपारी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी शहराजवळी बारगाव नांदुर रस्त्यालगत असलेल्या आतार मळ्यात दुपारच्या वेळी दोन तरुण आले. यावेळी शफिक अतार व शहजान आतार हे वृद्ध दांपत्य घरी होते.या वृद्ध दांपत्यास वस्तीवर आलेल्या दोन भामट्यांनी दागिण्यास पाँलीश करुन देतो असे सांगितले.
या वृद्ध दांपत्यांनी विश्वास ठेवून घरातील कपाटातील दागिणे काढून दिले. या भामट्यांनी एका भांड्यात केमिकल टाकुन त्यावर झाकण घातले यावरील झाकण काढु नका हे भांडे गँसवर ठेवण्यास सांगितली. वृद्ध दांपत्याने ते भांडे गँसवर ठेवली. त्या भामट्यांनी वृद्ध दांपत्यास भुरळ पाडून सोन्याचे दागिणे घेवून पोबारा केला. काही वेळाने गँसवर ठेवलेले भांडे उघडून पाहिले असता ते मोकळे असल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध दांपत्यास आपण लुटलो गेल्याचे समजताच आरडाओरड सुरु केला.नातेवाईकांना फोन करुन बोलावून घेतले.हि घटना राहुरी पोलिस ठाण्यात समजताच पो.काँ.सचिन ताजणे,नदिम शेख यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.