मुंबई : मुंबईतील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा सानेच्या हत्येच्या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे.या तपासात प्रमुख संशयित मिट्टू सिंग याच्या घरात एक टायर ट्यूब सापडली असून त्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत. स्वदिच्छाचा मृतदेह खोल पाण्यात फेकण्यासाठी त्याने याचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस आता साने कुटुबींयांच्या रक्ताचे नमुने आणि ट्युबवर सापडलेले रक्ताचे नमुने याची पडताळणी करणार आहे. जर ते जुळले तर मिट्टू सिंग विरोधात मोठा पुरावा पोलिसांना मिळेल. मिट्टू सिंग सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.
- सिंग आणि साने यांच्यातील वादात स्वदिच्छा वांद्रे बँडस्टँड येथील एका दगडावर पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर सिंगने लाईफ जॅकेट आणि टायर ट्यूबचा वापर करुन तिला खोल पाण्यात नेऊन टाकलं. त्यानंतर तो ट्यूब घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला असं सूत्रांनी सांगितलं आहे.