अब्दुल शेख खून प्रकरणी आरोपीना जन्मठेपेची शिक्षा

0

पैठण,.२३(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना समोरील एका हाॅटेल मध्ये तिघे मित्र भजे खाण्यासाठी १९ आॅक्टोबर २०२२ रोजी गेले होते भजे खात असताना त्या ठिकाणी मयत अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख(वय ३५ वर्ष ) व आरोपी रामेर उर्फ राम गजेसिंग बोत यांच्या मध्ये शुल्लक कारणावरून भांडणे झाल्याने आरोपीने तिथेच बाजूला असलेल्या अंडा आम्लेट दुकानातील कांदा कापण्याच्या चाकुने मयतांवर वार करून पळून गेला होता जखमीला तात्काळ एक मित्र व हाॅटेल मालक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी  मध्ये दाखल केले होते उपचारादरम्यान तो मयत झाला होता तर फरार आरोपी हा खुन करून पळून जात असताना  पोलिसांनी पाठलाग करुन पकडून अटक केली होती मयताचा भाऊ शफीक शेख यांने फिर्याद दिली होती त्यानुसार आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल होऊन जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे याबाबत खटला सुरू होता त्याचा निकाल मंगळवार(दिं.२१) रोजी मा.न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील एस बी करंडे यांनी पाहिले सदर गुन्ह्यांच्या तपासकामी पैठणचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहूल व एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,पोलिस जमादार गणेश शर्मा, पोलिस अंमलदार मिलींद घाटेश्वर, राजेश सोनवणे, राहूल मोहोतमल  यांनी मोलाची कामगिरी बजावली तर एमआयडीसी पैठणचे सध्याचे प्रभारी सपोनि ईश्वर जगदाळे यांनी साक्षीदार यांना वेळोवेळी मा. न्यायालयात साक्षी कामी हजर ठेवून सदर घटनेचा पाठपुरावा करून साक्षीदार यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here