अभियंता दिन व रक्तदान शिबीराचे गुरूवार (दिं.१९) रोजी आयोजन

0

पैठण,दिं.१९.(प्रतिनिधी): कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. जलसंपदा खाते मराठवाडा व फेडरेशन ऑफ रिटायर्ड डिप्लोमा इंजिनियर्स (फोर्ड) महाराष्ट्र यांच्या वतीने अभियंता दिन व रक्तदान शिबीराचे गुरूवार (दिं.१९) रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या दगडी धरणाचे उपविभागीय अभियंता तथा कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. जलसंपदा खाते मराठवाडा मु. छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष दिंगबर रायबोले यांनी दिली.

   

कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. जलसंपदा खाते मराठवाडा मु. छत्रपती संभाजीनगर व फेडरेशन ऑफ रिटायर्ड डिप्लोमा इंजिनियर्स  महाराष्ट्र यांच्या वतीने अभियंता दिन व रक्तदान शिबीराचे आयोजन गुरूवार (दिं.१९) रोजी  सकाळी ११.३० वाजता 

सर विश्वेश्वरैय्या सभागृह, सिंचन भवन, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले असुन सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता इजि. विजय घोगरे तर उदघाटक म्हणून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक इंजि.संतोष तिरमनवार हे असणार आहेत.

 

या प्रसंगी किरणकुमार धोत्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गो.म.पा.वि.म., छत्रपती संभाजीनगर,इंजि. भारत शिगांडे अधिक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळ छत्रपती संभाजीनगर, इंजि. समाधान सब्बीनवार अधिक्षक अभियंता व प्रशासक ला.क्षे.वि.प्रा.,इंजि. संदीप सोनवणे अधिक्षक अभियंता गुणनियंत्रण मंडळ उपस्थित राहणार आहेत.

   तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. जलसंपदा खाते मराठवाडा अध्यक्ष इंजि. दिगंबर  रायबोले,तज्ञ संचालक जयवंत गायकवाड ,चंद्रशेखर डोनगांवकर,इंजि. दिपाली सु. पाटील उपाध्यक्ष, इंजि. कैलास  साळी सचिव,इंजि. राजन  खापर्डे कोषाध्यक्ष, संचालक महेश देशमुख, मनोज वाकचौरे,अंकाक्षा पंडित, धनंजय शास्त्री, रामेश्वर सानप, निलेश मरापे, सतिश कोलते,विनयचंद्र बडे उपाध्यक्ष फोर्ड,सय्यद मतीयुद्यीन, मुरलीधर म्हस्के,भारत पवार, व्यवस्थापक दत्तात्रय हनुमंते सह सर्व संचालक मंडळ, कनिष्ठ अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. जलसंपदा खाते मराठवाडा मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here