पैठण,दिं.७.(प्रतिनिधी):गणेशोत्सवामध्ये नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये व चांगल्या प्रकारच्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी उमेदअंतर्गत महिला बचत गटाकडून गणेश मूर्ती तयार करण्यात येतात व जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्फत बचत गटांना सदरील गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते यातून महिला बचत गटाकडून गणेश मूर्ती तयार करण्यात येऊन बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात येतात.
यासाठी सदरील बचत गटाकडून मूर्ती नागरिकांनी खरेदी कराव्या अशी आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीनाजी प्रकल्प संचालक अशोक शिरशे गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश कांबळे कनिष्ठ प्रशासनाधिकारी किशोर निकम यांच्याकडून करण्यात आलेली आहे. उमेदअंतर्गत बचत गटाकडून गणेश मूर्ती विक्रीसाठी लावलेल्या दुकानात पंचायत समितीचे सागर डोईफोडे, संदीप घालमे, खंडू वीर, सुहास पाटील, रमेश आगाव, नितीन निवारे, गंगाधर निसर्गर, संजय पवार, दिनेश सवने, अमोल भागवत मूर्ती गणेश मूर्ती खरेदी करताना