पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी): पैठण शहरातील रामनगर येथील ऋषिकेश सोनवणे यांची शासकीय कोट्यातून बी एएमएसला भोपाळ येथे निवड झाल्याबद्दल त्याचा भव्य सत्कार करण्यात आला.
भगवान बाबा माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक कल्याण सोनवणे यांचे चिरंजीव ऋषीकेश कल्याण सोनवणे याची ऑल इंडिया प्रथम राऊंड मधून शासकीय कोट्यातून बीएमएस ला एल.एन. कॉलेज अँड हॉस्पिटल भोपाळ साठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल आशा विहार पैठण येथील सर्व रहिवाशांनी मित्रमंडळींनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पैठण तालुकाध्यक्ष तथा दैनिक सकाळचे बातमीदार गजानन पाटील आवारे, चंद्रकांत झारगड, हरिश्चंद्र धांडे, रविंद्र पाटील, गायकवाड सर, बाहेती साहेब विजय बोबडे, पाटील साहेब, सुरेश कवले, शिंदे साहेब, खांडेकर, अॅड उगले,सिध्दु लोंढे,जाजे, परमेश्वर गरजे सह आशा विहार रामनगर, यशवंतनगर, नाथ विहार येथील नागरीक उपस्थित होते.