पैठण.(प्रतिनिधी): कारकीन ता.पैठण येथे सुरू असलेल्या भागवत कथेची मोठ्या भक्तिभावाने शनिवार (दिं.१२) रोजी सांगता. पैठण तालुक्यातील कारकीन येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा भागवताचार्य विष्णूजी महाराज देशमुख यांच्या अमृततुल्य वाणीतून सुरू होता त्याची सांगता शनिवार (दिं.१२) रोजी झाली.
यावेळी भागवताचार्य विष्णूजी महाराज देशमुख यांचे रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे पाटील यांच्या हस्ते श्री संत एकनाथ महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना चेअरमन विलास बापू भुमरे म्हणाले की,कारकीन येथील बद्रीनाथ पाटील लिपाने हे पंचक्रोशीत भाविकांसाठी दर वर्षी नवरात्रौत्सव मध्ये श्रीमदभागवत सप्ताहाचे आयोजन करतात त्यांच्या या विद्यायक व धार्मिक वृत्तीमुळे नागरीकांना भागवत कथेचे श्रवण होते असेच त्यांच्या हातून मोठमोठाले सप्ताह व्हावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बद्रीनाथ पाटील लिपाने, विनोद पाटील बोंबले, रविंद्र शिसोदे , खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश जिजा बोबडे पाटील,ज्ञानेश्वर गोरे,अक्षय मुळे,जालिंदर लिपाने, रामनाथ लिपाने, गोविंद लिपाने,ध्रुवबाळ लिपाने, मनोहर लिपाने, अंकुश गुंजाळ, अन्नासाहेब गुंजाळ, रमेश नवले, रंजीत नवले, गजानन व्यवहारे, अंकुश लिपाने,बंडू पेंढारे, बाळकृष्ण लिपाने, प्रल्हाद लिपाने, अनिल गवळी, नितीन मुळे, रमेश मुळे, कृष्णा बोबडे सह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.