पैठण,दिं.३०.(प्रतिनिधी) : श्रीक्षेञ जुने पैठण मधील रंगाराहट्टी गल्ली परिसरातील जलकुंभाचे बांधकाम बंद पडले होते त्या कामात केंद्रीय रेल्वे,कोळसा,खाणं राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब पा.दानवे यांनी जातीने लक्ष घालून पिण्याच्या पाण्याच्या टाकीची बांधकाम परवानगी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून तातडीने मिळवुन दिली त्याबद्दल जलकुंभ निर्माण पाठपुरावा कृती समितीने दिनांक 30,रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंञी मा.ना.रावसाहेब पा.दानवे यांची भेट घेवून टाकी बांधकाम बाबत चर्चा केली त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री लक्ष्मण औटे,विजय चाटुपळे,मुरलीधर साबळे,सतीष आहेर,प्रसाद खिस्ती,दिनेश पारीख, आदींचा समावेश होता.
पैठण आपेगांव विकास प्राधिकरणातुन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिवन प्राधिकरण स्थानिक कार्यालया मार्फत टाकीचे 75 % बांधकाम झाल्यानंतर ते बंद झाल्यामुळे नागरीकांना धक्काच बसला होता.केंद्रीय रेल्वेमंञी यांनी बाकीच्या बांधकामाची परवानगी मिळवुन दिल्यामुळे येत्या काही दिवसांत टाकीची बांधकाम सुरु होईल तशा हालचाली होतांना दिसत आहे.