खामगाव ता.फुलंब्री येथे तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न

0

फुलंब्री :-  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय छ.संभाजीनगर व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय तंबाखूमुक्त आरोग्य कार्यशाळा मंगळवारी गोरक्ष फार्मसी महाविद्यालय,खामगाव ता.फुलंब्री येथे घेण्यात आली.

जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दयानंद मोतीपिवळे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.पद्मजा सराफ तसेच फुलंब्री पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर,शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांच्या निर्देशानुसार ही कार्यशाळा घेण्यात आली. या प्रसंगी केंद्रप्रमुख सुनिल चिपाटे,कैलास व्यवहारे,पंडीत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक बाळकृष्ण बखरे यांनी केले.सलाम मुंबई फाऊंडेशनचे छ.संभाजीनगर जिल्हा समन्वयक प्रशांत उबाळे यांनी  तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी शाळा स्तरावर ९ निकषांची माहिती देवून सलाम मुंबई तंबाखूमुक्त शाळा ॲपवर निकषा प्रमाणे माहिती अपलोड कशी करावी यासह राष्ट्रीय बालस्नेह परिषदे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित शाळेचे २५० मुख्याध्यापक उपस्थित होते.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण बखरे, संजय पुंगळे,शेख फत्तेमोहंमद,बी.टी.साळुंके, भाऊसाहेब पाटील,उज्वलकुमार म्हस्के,मंगेशकुमार अंबिलवादे,गणेश तुपे,देविदास खिल्लारे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here