पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी कारकीन ता.पैठण येथे भेट दिली असता त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने बद्रीनाथ पाटील लिपाने (आबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले की,जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने मी छत्रपती संभाजीनगरचा खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असून मी छत्रपती संभाजीनगर सह जिल्ह्यात विकासाच्या विविध योजना आणणार असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार भुमरे यांचे औक्षण कु भक्ती लिपाने,गिता लिपाने या दोघींनी केले. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक नंदू काळे,दामुअण्णा नवपुते, बद्रीनाथ लिपाने पाटील, उपसरपंच जालिंदर लिपाने,मनोहर लिपाने,आकाश लिपाने, प्रल्हाद लिपाने,तात्या नवले सह आदी उपस्थित होते.