खा. संदीपान भुमरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन.

0

पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरनगचे खासदार संदिपानजी पाटील भुमरे  यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पैठण विधानसभेच्या वतीने तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार (ता.१६) रोजी करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता पाचवी ते सर्व क्षेत्रातील पदवीधर युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.भव्य नोकरी महोत्सव मध्ये  जॉब कार्ड वाटप मेळावा मंगळवार (ता.१६) रोजी  सकाळी ९ ते दु. ३ वा.स्थळ माहेश्वरी भक्त निवास, उद्यानरोड, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून युवकांनी अधिक माहितीसाठी संपर्क 

माजी उपनगराध्यक्ष शहादेव पाटील लोहारे  9623801301,प्रा. संतोष गव्हाणे  9850697007, प्रा. संतोष तांबे : 9850017175,विजय सुते : 9225319019 यांच्याशी करण्याचे आवाहन आयोजक  शिवसेना, युवासेना, शिक्षकसेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटना पैठण तालुका यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here