पैठण,दिं.१०.(प्रतिनिधी):गाव तिथे वडवृक्ष उपक्रम 2024 अंतर्गत आनंदपुर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद छत्रपतीसंभाजीनगर विकास मीना ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ओम प्रसाद रामावत यांच्या सूचनेनुसार आज ग्रुप ग्रामपंचायत आनंदपुर/ शृंगारवाडी मध्ये माननीय गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड मॅडम यांच्या हस्ते आज पाच झाडे (वड /उंबर) लागवड करण्यात आली.
यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये त्याचबरोबर कॅनॉल लगत नाथ मंदिराजवळ व स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी पंचायत समिती कार्यालयाकडून ग्रामविकास अधिकारी ईश्वर सोमवंशी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गंगाधर निसरगंध उपस्थित होते सरपंच सौ. वर्षा सोपान खरात उपसरपंच मीरा ज्ञानेश्वर चींधे ग्रां सदस्य विनोद खरात, सुनील बनकर ग्रामसेवक सागर डोईफोडे, कृषी सहाय्यक श्रीमती केंद्रे, पोलीस पाटील गोकुळ लगडे ,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अरूण गोर्डे व शिक्षक वृंद उदय सुलाखे , ठोंबरे ,जोशी त्याचबरोबर आनंदपुर येथील बहुसंख्य ग्रामस्थ
हे उपस्थित होते.