पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी): ग्रीन संकुल मिशन 2.0अंतर्गत मुधलवाडी येथील जि प प्रा शाळा परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. जि प प्रा शा मुधलवाडी येथे ग्रीन स्कूल मिशन २.०अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून परीसरात सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास ग्राइंड मास्टर प्रायव्हेट लिमिटेड चे पंकज जोशी, अश्विन वाघ सह इको सत्व लिमिटेडचे कृष्णा तांबे , शेख,सरपंच भरत मुकुटमल . ग्रामपंचायत अधिकारी राधाकृष्ण चौधरी,उपसरपंच ढाकणे,ग्रामपंचायत सदस्य सतीश लबडे ,काकासाहेब बर्वे,कैलास मदन,सुरेश शिंदे,दीपक गव्हाणे,सोनू पोकळे,शिवाजी जाधव,लाला जाधव,लाला कुरेशी,विष्णू डाके,सुशील बोडखे,विक्रम आढाव सह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव,रामदास भगत,अर्जुन जाधव,सिद्धार्थ चाबुकस्वार,मोसिन शेख, केंद्रप्रमूख शिवाजी महालकर , मुख्याध्यापक आबासाहेब कणसे सह शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश होता. याप्रसंगी शेख यांनी मियावाकी तंत्रज्ञानाची माहिती समजून सांगितली यावेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सर्व शाळेमार्फत स्वीकारण्याचे आश्वासन मुख्याध्यापक आबासाहेब कनसे यांनी दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश खुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आबासाहेब कणसे यांनी केले.
———-
भरत मुकुटमल( सरपंच मुधलवाडी एमआयडीसी पैठण) : सध्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावोगावी वृक्षारोपण मोहिम राबविली पाहिजे व वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जवाबदारी संबधितांनी घेऊन आपला परीसर हिरवा गार करावा जेणेकरून वातावरण प्रदूषित होणार नाही.