पैठण,दिं.१.(प्रतिनिधी):आनंदपुर/शृंगारवाडी तालुका पैठण ग्रामपंचायतला सण 2021-22 या वर्षाचा आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपये प्रमाणपत्र व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांच्या हस्ते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाँ ओमप्रसाद रामावत गटविकास अधिकारी श्रीमती उषा मोरे, कक्ष अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी एस एल इंगळे, डी टी गवळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार सरपंच सौ वर्षा सोपान खराद, तत्कालीन सरपंच सौ संगीता विनोद खराद, उपसरपंच सौ मीरा ज्ञानेश्वर चींधे, ग्रामसेवक सागर डोईफोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी संदिपान पाटील भुमरे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती, तसेच विलास बापू भुमरे, मा सभापती, नामदेव दादा खरात स्वीय सहायक तसेच सर्व ग्रामस्थ ग्रुप ग्रामपंचायत आनंदपुर शृंगारवाडी व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी बंधू भगिनी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले