फुलंब्री प्रतिनिधी :- सेवा ट्रस्टच्या वतीने दिनांक २०/०१/२०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे इयत्ता चौथी व पाचवी साठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.इयत्ता चौथीच्या चित्रकला स्पर्धेत प्रथम-वैभव जाधव,द्वितीय- काजल कापडे,तृतीय-मानसी लहाने,उत्तेजनार्थ-देवयानी ताठे यांनी पटकाविला.इयत्ता पाचवीच्या निबंध स्पर्धेत प्रथम -अनन्या ताठे,द्वितीय-वेदिका कापडे,तृतीय-रोशनी ताठे,उत्तेजनार्थ-दत्ता डीघोळे याने मिळविला.
या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेच्या वतीने वैशाली खमाट व गणेश खमाट यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.शाळेतील स्पर्धेचे नियोजन उज्वलकुमार म्हस्के सर यांनी तर परीक्षक म्हणून सांडू शेळके सर व संगीता वाढोणकर मॅडम यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन शेळके सर यांनी केले.या प्रसंगी मुख्याध्यापिका मंगल वेळे मॅडम,मंगला पाटील मॅडम,उमेश मुळे सर,स्वप्निल पाटील सर,रूपाली घुगे मॅडम यांची उपस्थिती होती.